Share

लाडकी बहीण योजना बंद होणार का? Ajit Pawar यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले…

by MHD
Ajit Pawar big decision regarding Ladki Bahin Yojana

Ajit Pawar । आज अर्थंसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षीच्या काही योजना बंद होणार की नाही? यावर स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे विरोधकांना मोठी चपराक बसली आहे.

“काही योजना या त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार चालू केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होते. ज्या योजना कालबाह्य होतात त्या बंद कराव्या लागतात. कितीही किंमत मोजावी लागली तरी महायुती सरकार लोकोपयोगी योजना बंद करणार नाही,” असा दावा अजित पवारांनी केला.

काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. त्यावरुनही अजित पवारांनी निशाणा साधला आहे. “तुमच्याकडे 15-20 टाळकी आणि मुख्यमंत्री करू म्हणतात. पुढील पाच वर्ष या सरकारला ब्रम्हदेव आला तरी धक्का लावू शकत नाही,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

“तुम्ही काही काळ सत्तेत होता, तुमचे श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती नाही. जर तुम्हाला मागील पाच वर्षात राज्याने प्रगतीच केली नाही, असे म्हणायचे असेल तर त्यातील काही काळ तुम्ही सत्तेवर होता, याचा विचार करा,” असा सल्ला अजित पवारांनी विरोधकांना दिला.

Ajit Pawar decision about Ladki Bahin Yojana

“लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) आम्हाला आपुलकी आहे. पण काहींची गांडूळासाखी अवस्था आहे, ते कोणत्या तोंडाने चालते हे समजत नाही. ⁠पाच वर्षाचा वचननामा असतो, ⁠तो आम्ही देणार आहोत. ⁠लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार पण बंद करणार नाही,” असे अजित पवारांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

Today, in the budget session, Ajit Pawar has taken a big decision regarding the Ladki Bahin Yojana.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now