Sanjay Raut । “शंभर दिवसांत एक बळी गेला असून येत्या सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे,” असा खळबळजनक खुलासा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनीदेखील एक मोठा दावा केला आहे.
“राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत, ज्यांचे अनेक चेहरे आता समोर येत आहेत. धनंजय मुंडे यांचा बळी गेला. 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत, त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केले, त्यांचा बळी जाणार आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी जी रावल को-ऑपरेटिव्ह बँकेत कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. त्यांनी जनतेचा पैसा लाटला आहे. जयकुमार रावल हे अतिशय भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांची जमीन रावल यांनी लाटली. लवकरच हे प्रकरण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठवणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
“हिंसक हिंदुत्ववाद्यांचे लोक सत्तेत, कबर हटवण्यास कोणी अडवलं? महाराष्ट्रात, देशात राज्य कोणाचे आहे? त्यांच्याच पक्षाचं आहे ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? त्यांना कबर हटवायला कोणी अडवले आहे?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut on Tomb of Mughal Emperor Aurangzeb
पुढे ते म्हणाले की, “बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ही आरएसएसचीच, भाजपचीच पिल्ले आहेत. हे सगळे करून वातावरण खराब करत बसण्यापेक्षा सरकारी अध्यादेश काढा. हिंमत आहे का?,” असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या :