Share

“औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून…”; Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य

by MHD
Jitendra Awhad on Aurangzeb Tomb Row

Jitendra Awhad । खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन (Aurangzeb tomb controversy) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“हजारो विषय पेंडींग असताना औरंगजेबवर (Aurangzeb) बोलण्यात येत आहे. आपण इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही. पण औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले,” असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

“औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे नेमकं काय करायचं? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्यीकरण हा विषय वेगळा आहे. एकदाची ती कबर काढूनच टाका. दररोज तेच बोलले जात आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटू शकते. विरोधक याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधू शकतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण का द्यावे लागत आहे? याचे स्पष्टीकरण दिले आहे. “या देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मंदिराचं महिमामंडन होईल. औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही. 50 वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने संरक्षित स्थळ घोषित केले असल्याने त्याच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर आली आहे, हे आमचं दुर्दैवं आहे,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis statement on Aurangzeb Tomb

“काहीही झाले तरी त्याच्या कबरीचं महिमामंडन येथे होऊ देणार नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो प्रयत्न तिथेच चिरडून टाकण्यात येईल,” असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या :

While there is a controversy in the state over the issue of removing Aurangzeb tomb in Khultabad, Jitendra Awhad has now made a controversial statement.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now