Share

मोठी बातमी! Aurangzeb tomb हटवली जाणार? बजरंग दलाने दिले निवेदन

by MHD
Bajrang Dal gives statement to demolish Aurangzeb tomb

Aurangzeb tomb । राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. अशातच आता बजरंग दल औरंगजेबाच्या कबरीवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बजरंग दलाने औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी निवेदन दिली असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिली आहे. त्यामुळे आता औरंगजेबाची कबर पाडली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

“पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि तालुका स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या विषयावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे,” अशी माहिती दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

“खुलताबाद (Khultabad) येथे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून अगोदरच कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. शहरात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त केला आहे,” असेही दिलीप स्वामी म्हणाले.

Dilip Swami on Aurangzeb tomb

त्याशिवाय खुलताबाद यतेचे औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये एसआरपीएफचे 115 शस्त्रधारी जवान, 60 पोलिस अंमलदार, दंगल नियंत्रण पथकातील 25 पोलिस जवान, महिला पोलिस, भारतीय पुरातत्त्व विभागाचे खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Chhatrapati Sambhajinagar District Collector Dilip Swami has informed that Bajrang Dal has submitted a memorandum to demolish Aurangzeb tomb.

Marathi News Chhatrapati Sambhajinagar Maharashtra