Harshvardhan Sapkal । काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून सडकून टीका करण्यात आली होती. फडणवीसांचा कारभार औरंगजेबासारखाच क्रूर होता, असे सपकाळ म्हणाले होते.
त्यामुळे सपकाळ यांच्यावर भाजपकडून (BJP) टार्गेट केले जात होते. अखेर सपकाळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “राज्यात सुरु असलेल्या प्रकरणामुळे औरंगजेबाचा जसा कारभार होता तसा फडणवीसांचा आहे, असे म्हणालो. मी फडणवीसांच्या कारभारावरून टीका केली, वैयक्तिक त्यांच्यावर टीका केली नाही. पण भाजपाच्याच लोकांनी फडणवीसांची तुलना औरंगजेबासोबत केली,” असे सपकाळ म्हणाले. (Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis)
“माझ्या वक्तव्यावरून भाजपची का पोटदुखी झाली? ते मला समजलं नाही. मी काही चुकीचे बोललो नाही. त्यांच्याबाबदल कोणतेच अपशब्द वापरले नाहीत. त्यांचा एकेरी उल्लेख मी केला नाही. फडणवीसांनी औरंगजेबासारखी वेशभूषा करावी इतकाच त्यात फरक आहे,” असंही मी बोललो नसल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
“माझी टीका राज्यकारभाच्या अनुषंगाने आहे. असे असूनही भाजपमधील नेतेमंडळी सरसकट देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबासारखे होते असा जो कांगावा करत आहेत. त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना औरंगजेब ठरू पाहात आहेत,” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Harshvardhan Sapkal responds to criticism of Devendra Fadnavis
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेबाबत भूमिका स्पष्ट करताना पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केले आहे. यावर आता भाजप त्यांना काय प्रत्युत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :