IPL 2025 । 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला (IPL) सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआर (KKR) आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी (RCB) यांच्यात होणार आहे. आयपीएलचे हे सामने तुम्ही मोफत पाहू शकता.
स्टार स्पोर्टस चॅनेल (Star Sports Channel) आणि जिओ हॉटस्टारवरुन (JioHotstar) तुम्ही आयपीएल पाहू शकता. रिलायन्स जिओने खास आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. इतकेच नाही तर या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही जिओ फायबरला आणि जिओएअर फायबरवरून सामने पाहू शकता.
90 दिवसांसाठी जिओ त्यांच्या ग्राहकांना जिओ हॉटस्टारचे मोफत सब्रस्क्रीप्शन देत असून जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांना किमान 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. यात ग्राहकांना दीड जीबी डेटा मिळतो.
नवीन सिमकार्डधारकांना देखील 299 किंवा त्याच्या जास्त किंमतीच्या रिचार्जवर जिओ हॉटस्टारचा मोफत लाभ मिळणार आहे. हे लक्षात घ्या की जिओ फायबर आणि जिओएअरफायबर 50 दिवसांसाठी फ्री ट्रायल देत आहे.
JioHotstar offer for IPL 2025
ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की जिओची ही ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे. कंपनीची ही ऑफर 17 मार्च ते 31 मार्चदरम्यान वैध असेल. जे आता रिचार्ज करत असतील त्यांचा जिओहॉटस्टारचा पॅक 22 मार्चपासून सक्रिय होणार आहे. ज्यांनी 17 मार्चपूर्वी रिचार्च केला असेल त्यांना 100 रुपयांचा अॅड-ऑन पॅक घ्यावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :