Share

इंडियाज गॉट लेटेन्टनंतर नेटकऱ्यांच्या रडारवर BhaDiPa, ‘त्या’ व्हिडिओवरून केली कारवाईची मागणी

by MHD
Netizens demand action on Netizens demand action on BhaDiPa Sarang Sathaye

BhaDiPa । यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahabadia) पालकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे कॉमेडियन समय रैनाचा (Samay Raina) इंडियाज गॉट लेटेन्ट हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

अशातच आता इंडियाज गॉट लेटेन्टनंतर भाडिपा या युट्यूब चॅनलवरील अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. भाडिपा चॅनलचा सर्वेसर्वा असणारा सारंग साठ्ये (Sarang Sathaye) याला नेटकरी ट्रोल करत आहेत. याला कारण आहे म्हणजे त्यांचा अश्लील कंटेंट. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या शोमध्ये डबल मिनिंग, अश्लील आणि दर्जाहिन भाषेचा वापर करुन विनोद केला जातो. हा शो रंगमंचावर देखील सादर केला जातो.

Take strict action against Bhadipa

अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या शोसारखा भाडिपाचा लहान मुलांसाठीचा भारतीय बच्चा पार्टी हा शो आहे. या शोमधील लहान मुलांचे काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असल्याने त्यावर नेटकरी चिडले आहेत. सारंग साठ्ये याने शोमध्ये एका लहान मुलीला आणि मुलाला मोठे होऊन कोणाशी लग्न करायचे आहे? एकमेकांबद्दल काय आवडत? तसेच त्यांना प्रेमाबद्दल प्रश्न विचारले आहेत. सारंग साठ्ये याच्या प्रश्नावरून नेटकरी भडकले आहेत.

यावरून सोशल मीडियावर एका नेटकाऱ्याने माहिती व प्रसारण मंत्रालयासह केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना टॅग करत या शोवर कारवाई करण्याची आणि तातडीने या शोसंबंधित सर्व कंटेन्ट सोशल मीडियावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

Netizens criticizes BhaDiPa & Sarang sathaye

“सोशल मीडियावर मराठीत भाडिपा नावाचा एक गलिच्छ उकिरडा आहे.जर रणवीर अलाहाबादिया आणि त्याच्या गॅंगवर पोलिस केस होते, तर भाडिपामध्ये विनोदाच्या नावाखाली जी अश्लीलता चालू असते, त्याचे काय? मराठी अस्मितेच्या लेबलखाली भाडिपाला विशेष सवलत मिळाली आहे?”, असे ट्विट एक्सवर बिईंग मुंबईकर या वापरकर्त्याने केले आहे.

“या सगळ्यात मराठीत कॉमेडी करणारे कुठेही मागे नाहीत. स्वतःचं दुकान चालवायला येणारी पिढी कशी बरबाद करायची त्याचं शिस्तीत प्लानिंग सुरू आहे. आपण समाजाला काय देतोय या माध्यमातून याचा विचार करायला हवा. ते दोन चिमुकले त्यांचं वय काय आपण त्यांना कसले प्रश्न विचारतोय.. त्यांना कुठल्या दिशेला विचार करण्यास प्रवृत्त करतोय याचा थोडा विचार करा. Cute म्हणून हसू नका. तुमच्याच लेकरांचं नुकसान आहे यात.

“लग्न म्हणजे सेक्स, जगासमोर स्वतःच्या बायकोला गलिच्छ रित्या रोस्ट करवून घेणं आणि मोठ्याने त्यावर दात काढून हसणं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती नाही. भाडिपाला थोडं आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. चांगला विनोद असेल तर स्वागतच आहे पण ही अश्लीलता सहन करून घेणार नाही. ज्या महाराष्ट्राला पु. ल. देशपांडे व व. पू. काळेंचा वारसा लाभलाय त्या महाराष्ट्रात ही घाण चालू देणार नाही”.

“सस्ती कॉपी इंडियाज गॉट लेटेन्टचा प्रयत्न हाणून पाडू. अतिशय निर्लज्ज भाडिपा, सारंग साठ्येला महाराष्ट्रात घाण करू देणार नाही म्हणजे नाही. निखळ विनोद असेल तर स्वागत आणि घाण असेल तर फाट्यावर. विषय संपला,” अशीही टीका सुनैना होले यांनी केली आहे.

BhaDiPa ( Sarang sathaye ) cancels upcoming show

दरम्यान, भाडिपाचे दोन्ही शोच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून सारंग साठ्ये याने अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याबाबत भाडिपाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “भाडिपा फॅन्सना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो आम्ही पोस्टपॉन करत आहोत. व्हॅलेन्टाईन्स डेला प्रोमोपेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या फॅन्सवर प्रेमच आहे. आमच्या टॅलेन्टला आणि प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे,” अशा आशयाची पोस्ट भाडिपाने केली आहे.

“तिकिटांची रक्कम 15 दिवसांत तुमच्या बँक खात्यांवर जमा होईल. याच रिफंडच्या पैशांतून स्वत:साठी काहीतरी छान गिफ्ट घ्या. आमचा एक्स्क्लुझीव्ह कंटेन्ट पाहण्यासाठी यूट्यूब मेंबरशीप चालू केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदोपोहेचे सर्व व्हिडीओज 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठीच पाहायला उपलब्ध करून दिले आहे,” असेही भाडिपाने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

After India’s Got Latent, BhaDiPa is criticizing the YouTube channel. The netizens have demanded that action should be taken against this show.

Entertainment Marathi News

Join WhatsApp

Join Now