धमक होती दुसरा पक्ष काढा ना? कुणी अडवलं होतं?; Ajit Pawar यांचा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar old Video viral

Ajit Pawar | निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्याने यावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरच मनसेनं (MNS) खास शैलीत अजित पवारांचा समाचार घेतला आहे.

मनसेने अजित पवारांचा जुना व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की,”भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या…! असे म्हणत मनसेनं अजित पवारांवर टीका केली आहे.

बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ… अशी पोस्टही मनसेने केली आहे.

एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी विरोधीपक्षात असणाऱ्या अजित पवारांनी भाषण करत शिंदे यांच्यावर टीका केली होती. तोच जुना व्हिडिओ सद्या चर्चेत आला आहे.

व्हिडीओत Ajit Pawar काय म्हणाले ?

ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला. शिवाजी पार्कमध्ये काढलेला पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहचवला.त्यांचाच पक्ष काढून घेतला. त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगानं दिलं असले तरी जनतेला पटलेय का? त्याचाही विचार झाला पाहिजे? धमक होती तर पक्ष काढा ना? तुम्हाला कुणी अडवलं होतं? असे अजित पवार व्हिडीओत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.