श्रद्धा कपूर करणार लग्न? Shraddha Kapoor ने पोस्ट शेअर करत दिली माहिती

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर विवाहबंधनात अडकणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shraddha Kapoor । बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अलीकडे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि लिन लॅशराम (Lin Laishram) यांनी मोठ्या लग्न केलं आहे. लवकरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) देखील लग्न करणार आहे.

श्रद्धा कपूर लग्न करणार असल्याची माहिती थेट श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून दिली आहे. श्रद्धा हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

Shraddha Kapoor To Be Get Married 

Shraddha Kapoor ने पारंपरिक लूकमध्ये फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘चांगली दिसत आहे, लग्न करु का?’ असं लिहिलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

श्रद्धा हिच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आदित्य रॉय कपूर याच्यासोबत लग्न कर….’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू फक्त सुंदर नाही तर, स्वर्गातून खाली आलेली अप्सरा वाटत आहेस…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) हिची चर्चा रंगली आहे.

Shraddha Kapoor Instagram Link

महत्वाच्या बातम्या