Share

”यात खूप काही चुकीचं…” Rohit Sharma च्या पत्नीने केला मोठा खुलासा

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Mumbai Indians Captaincy Controversy | So many things wrong with this’: Rohit Sharma’s wife

Published On: 

🕒 1 min read

Rohit Sharma IPL 2024 । मुंबई । इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League )  2024 साठी २२ मार्च ते २६ मे दरम्यान आयोजित करण्याचे ठरवले आहे.

या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. याचा परिणाम आयपीएलवर होतांना दिसून येत आहे.

IPL 2024 मध्ये आपल्याला अनेक संघात बदल झालेले दिसणार आहे. सर्वात मोठा बदल गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )  आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) मध्ये झालेला दिसून आला आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचं कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे. पांड्याला कर्णधार केले, त्यामुळे मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते. फॅन्सने मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) जर्सी जाळत निषेध नोंदवला होता.

मार्क बाउचर एका पॉडकास्टला मुलाखत देताना म्हणाला,”पांड्याकडे जबाबदारी दिल्याने रोहित शर्मा मनमोकळेपणाने फलंदाजी करू शकेल, असं त्याने सांगितलं होतं. तसेच त्याच्याकडे टीम इंडियाची जबाबदारी आहे, त्यामुळे त्याला तणावातून मुक्त करण्याचा हेतू होता, असं मार्क बाउचरने सांगितलं होतं.

रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हीने मार्क बाउचरच्या पॉडकास्टला कमेंट्स केली आहे. ” यात खूप काही चुकीचं आहे..”, अशी कमेंट्स रितीकाने केली आहे.

Rohit sharma wife ritika sajdeh finally opened up on the mumbai indians captaincy controversy

रितीकाच्या कमेंट्सनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चाना उधाण आले आहे.  नेटकरी दावा करत म्हणत आहे की, रोहित शर्माला न सांगता कर्णधारपदावरून दूर केलं आहे.

Rohit Sharma IPL Stats Vs Hardik Pandya IPL Stats

रोहितने ( Rohit Sharma ) २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक, ४२ अर्धशतके, ५५४ चौकार आणि २५७ षटकार आहेत. रोहितने IPL मध्ये १५ विकेट घेतल्या आहेत.

हार्दिकने १२३ सामन्यात २३०९ धावा केल्या आहेत. त्यात शून्य शतक, १० अर्धशतके, १७२ चौकार आणि १२५ षटकार आहेत. गोलंदाजीमध्ये हार्दिकने मोठी कामगिरी केलेली नाही आहे. त्याने १२३ सामन्यात ५३ विकेट घेतल्या आहेत. आकड्यावरून लक्षात येते रोहित शर्माची ( Rohit Sharma ) कामगिरी हार्दिक पंड्या पेक्षा चांगली आहे.

रोहित शर्मा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार 

रोहित ( Rohit Sharma ) 2011 पासून मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो आहे. तसेच 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे. रोहितच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावलं आहे.

रोहितने १६३ सामन्यांमध्ये MI चे नेतृत्व करताना ९१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६८ सामने गमावले असून ४ सामने बरोबरीत सुटले आहेत.

Mumbai Indians Team

  • यष्टिरक्षक : इशान किशन, विष्णू विनोद.
  • फलंदाज: रोहित शर्मा, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, देवाल्ड ब्रेविस
  • अष्टपैलू: हार्दिक पांड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड , नेहल वढेरा, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद नबी , शिवालिक शर्मा, नमन धीर.
  • गोलंदाज: जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाळ

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!