Chhagan Bhujbal | नाशिक: काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भाविकांनी या निर्णयाचा आक्षेप घेतल्यानंतर 24 तासातचं हा निर्णय मागे घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्याही मंदिरात ड्रेस कोड लागू करणे हा मूर्खपणा आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहे.
Chhagan Bhujbal’s reaction on temple dress code issue
छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले, मंदिरात येताना वाटेल तसे कपडे घालू नये. नेटनेटके कपडे घालावे हे मी समजू शकतो. मात्र, सर्वांना जर नीट कपडे घालायचे असतील तर मंदिरामध्ये अर्धनग्न असलेले पुजारी वगैरे त्यांना देखील अंगात सदरा-विदरा घालायला सांगा. त्याचबरोबर त्यांनी गळ्यात माळा घालावा म्हणजे ते ओळखू येतील. पुजारीही अर्धनग्न नसतात का?”
“शाळेला सुट्टी लागल्यावर एखादा मुलगा हाफ पॅन्ट घालूनच मंदिरात जाणार ना. मात्र, हाफ पॅन्ट घातल्यामुळे त्याला मंदिरातून बाहेर काढण्यात आलं. हा मूर्खपणा आहे,” असही ते (Chagan Bhujbal) यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील वाघोली विकास प्रतिष्ठाणने असा निर्णय घेतला आहे की, वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपडे घालून जाता येणार नाही. कारण गेल्या अनेक दिवसांपासून या मंदिरामध्ये शॉर्ट कपडे (Western Dress) परिधान करून अनेक जण दर्शनासाठी येतात. वेस्टर्न ड्रेसघालून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे मंदिराचं पावित्र्य भंग होत आहे. म्हणून काही भविकांनी देखील हा प्रकार बंद झाला पाहिजे अशी मंदिर ट्रस्टकडे तक्रार केली. यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी मंदिर ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX
- Ajit Pawar | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार? पुण्यात चर्चांना उधाण
- Gautami Patil | गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी
- Powassan Virus | चिंताजनक! कोरोनानंतर पॉवसन व्हायरस ठरतोय घातक, जाणून घ्या काय आहेत लक्षणं?
- Pre-wedding Photoshoot | प्री-वेडिंग फोटोशूटला बंदी घालता येते का? कायदेतज्ञ म्हणतात…