Powassan Virus | चिंताजनक! कोरोनानंतर पॉवसन व्हायरस ठरतोय घातक, जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

Powassan Virus | टीम महाराष्ट्र देशा: जगभरात कोरोना महामारीने (Corona) जवळपास तीन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशात एका नव्या व्हायरसने जगाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Powassan Virus is becoming dangerous after Corona

कोरोनानंतर आता नवीन साथीच्या रोगाचा सामना करावा लागू शकतो. हा रोग कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे, असं सांगण्यात आलं आहे. कोरोना, झिका आणि मंकीपॉक्सनंतर जगाला पॉवसन व्हायरसला (Powassan Virus) सामोरे जावे लागणार आहे. अमेरिकेमध्ये या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या या व्हायरसवर कोणत्याही प्रकारचे उपचार आणि लस उपलब्ध नाही. पॉवसन हा दुर्मिळ आणि गंभीर आजार मानला जात आहे.

पॉवसन या विषाणूबद्दल अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रिव्हेंशनने (US Centers for Disease Control and Prevention) ने माहिती दिली आहे. अमेरिकेमध्ये दरवर्षी सुमारे 25 लोकांना या विषाणूची लागण होते. अमेरिकेसोबतच कॅनडा आणि रशियामध्ये या विषाणूचे रुग्ण (Powassan Virus) आढळून आले आहेत.

या विषाणूची (Powassan Virus) लागण झाल्यानंतर ताप, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा यासारखे लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत राहतात. अद्याप या आजारावर कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध नाही.

महत्वाच्या बातम्या