Corona Update । 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी मास्क सक्ती

Coronavirus Maharashtra Latest News | Masks mandatory for persons 60 years and above

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Corona Update । कर्नाटक | देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे देशाची तसेच राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर आलेली आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या नवा व्हेरिएंटचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र सरकारने राज्याला कठोर निर्देश दिले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात कसून चाचणीच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांना कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

या भागांमध्ये आहे करोनाचे संकट | Corona Update 

कर्नाटक राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, आम्ही सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. केरळसोबतच राज्याच्या सीमा क्षेत्राशी संपर्कात येणाऱ्या परिसरामध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

मंगळुरू, चमनजनगर आणि कोडागु ही ठिकाणे सीमा परिसरालगत येत असल्याने आम्ही वैद्यकीय चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे तसेच श्वासोच्छवासाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांना चाचणी करणे बंधनकारक करावे लागेल”.

राज्यांना व्हायरसचे नवीन प्रकार ओळखण्यासाठी नमुने प्रयोगशाळांना पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेजारील कर्नाटक राज्य सरकारने 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्रात मास्क सक्ती?

दरम्यान, महाराष्ट्रात मास्क सक्ती नसली तर गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.

तसेच राज्यात आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करावी. त्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स याबाबत माहिती घ्यावी.

महत्वाच्या बातम्या