Share

Shalini Thackeray | शालिनी ठाकरेंची रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांना सणसणीत चपराक

Shalini Thackeray comment on rupali chakankar and chitra wagh | Ashwajit Gaikwad Vs Priya Singh । Latest News, Photos and Videos on Shalini Thackeray । News on shalini thackeray MNS in Marathi । MNS Shalini Thackeray

Published On: 

🕒 1 min read

Shalini Thackeray । ठाण्यात अश्वजित गायकवाड याने प्रिया सिंह या मॉडेलच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही  गुन्हेगाराला  लवकर अटक झालेली नव्हती. यात काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता.

अश्वजित गायकवाड याला देवेंद्र फडणवीसांचे अभय असल्याच्या चर्चा होत्या. कारण ज्याने गाडी घातली तो अश्वजित गायकवाड भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता आहे. तसेच MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे.

दरम्यान शालिनी ठाकरे ( Shalini Thackeray ) यांनी यावर प्रतिक्रिया देत रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. ठाकरे यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे कि,

ठाण्यात एका महिलेला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न होतो आणि आरोपी २ दिवसात सुटतो !
चित्राताई वाघ आणि रुपाली चाकणकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्रातील महिला एकदम सुरक्षित आहेत.

महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक असलेल्या रुपाली चाकणकर भाजप सोबत सत्तेत आल्यावर शांत झाल्याच्या चर्चा आहेत. तसेच चित्रा वाघ यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध परत स्थापन केले आहेत. चित्रा वाघ यांनी ही आपली तलवार चाकणकर यांच्या विरोधात म्यान केली आहे.

महिला आयोगाचे अध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. अध्यक्ष पदाचा गैरवापर रुपाली चाकणकर करत असल्याचा आरोप अनेकांनी यापूर्वी केला आहे. स्वपक्षीय असेल तर काहीच कारवाई नाही विरोधक असेल तर लगेच कारवाई, असा आरोप विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर केला जात आहे.

रुपाली चाकणकर यांच्यावर चित्रा वाघांची टीका हे वाचा पाटलांच्या इशा-यावरून बावळटबाई, नाचxxx; घुंगरू वाजवू नका…तमाशा चालणार नाही – चित्रा वाघ

त्याने माझ्या अंगावर गाडी घातली, प्रियाने रडत रडत सांगितली घटना

गेल्या रविवारी घोडबंदर रोडजवळ एका मित्राच्या संगीत फंक्शनमध्ये आल्याचे अश्वजितने प्रियाला सांगितले होते. सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास प्रिया तेथील हॉटेलजवळ पोहोचली. तिथे अश्वजीत त्याच्या पत्नीसोबत होता. प्रियाला अचानक बघून अश्वजीतला धक्का बसला. त्यानंतर सर्व घटना घडली, असे प्रियाने सांगितले.

अश्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले होते. त्या ठिकाणी त्याने शिवीगाळ करून जबर मारहाण केली. डाव्या हाताला चावा घेत, तिच्या अंगावर कार घातली, असा आरोप प्रियाने केला.

कोण आहे प्रिया सिंह ( Ashwajit Gaikwad Vs Priya Singh )

मुंबईत राहणारी प्रिया सिंह ही  मॉडेल, फिटनेस ट्रेनर, फॅशन प्रमोटर असून इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिचे इस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.  घोडबंदर येथील वाघबीळ भागात ती राहते. तिचे अश्वजितशी प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अश्वजित याचे लग्न झाले आहे. त्याने ते आपल्यापासून लपवून ठेवल्याचा प्रियाचा आरोप आहे. माझा घटस्फोट झाला असून तुझ्याशी मी लग्न करणार असल्याचे तो सांगत असल्याचे प्रियाकडून सांगण्यात आले.

काय म्हणाला अश्वजित गायकवाड ( Ashwajit Gaikwad Vs Priya Singh )

अश्वजित याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, प्रिया सिंह माझी केवळ मित्र होती. मी परिवाराच्या कार्यक्रमामुळे हॉटेलमध्ये आला होतो. त्या ठिकाणी प्रिया पोहचली. तिने जबरदस्तीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने मद्यपान केले असल्यामुळे मी नकार दिला. त्यानंतर ती गोंधळ घालू लागली. शिवीगाळ करु लागली. माझ्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मारहाण सुरु केली. त्याचवेळी चालकाने गाडी सुरु केली. त्यावेळी प्रिया रस्त्यावर पडली. हा एक अपघात होता. प्रियाचा माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अश्वजितने केला.

कोण आहे अश्वजित गायकवाड ( Ashwajit Gaikwad Vs Priya Singh )

MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे. तसेच तो भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता आहे.

Ashwajit Gaikwad Arrest 

या घटनेने समाजात खळबळ उडाली असतानाच महाराष्ट्र पोलिसांनी अश्वजितला उशिरा अटक करून २ दिवसात सोडून दिले आहे. अनेकांनी अश्वजितला हल्ल्यासाठी जबाबदार धरण्यात विलंब झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अश्वजित गायकवाडला अभय देत असल्याच्या चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!