MS Dhoni – सचिन तेंडुलकर नंतर महेंद्र सिंह धोनीचा मोठा सन्मान; हा सन्मान मिळवणारा धोनी दुसरा भारतीय

BCCI Retire Ms Dhoni Jersy No 7, Indian Players Not Pick Number 7

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni 7 jersey Retire : टीम इंडियाचा स्टार खेळाडू महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने क्रिकेटमधून 7 नंबर जर्सी निवृत्त केली आहे. बीसीसीआयने याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलर याची जर्सी निवृत्त केली होती. सचिन 10 क्रमांकाचा जर्सी घालत होता. बीसीसीआयने 10 आणि 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंना आता सात नंबरची जर्सी घालून खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात धोनीचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने एक ODI, एक T20I आणि एक चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून, त्याने 2007 T20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी या सर्व प्रमुख ICC ट्रॉफी त्याने भारतीय संघाला मिळवून दिल्या.

MS Dhoni ODI 

महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.57 च्या सरासरीने 10,773 धावा केल्या, 10 शतके आणि 73 अर्धशतके ठोकली. एकदिवसीय सामन्यात त्याने 321 झेल आणि 123 स्टंपिंग केले आहेत.

MS Dhoni T20I

T20I मध्ये, धोनीने 98 सामन्यात 126.13 च्या सरासरीने 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या. T20 मध्ये त्याने 57 झेल आणि 34 स्टंपिंग केले आहेत.

MS Dhoni Test 

धोनीने  97 कसोटी सामन्यांमध्ये 4876 धावा केल्या, सहा शतके आणि 33 अर्धशतके ठोकली, तसेच यष्टीरक्षक म्हणून 294 फलंदाजांना  बाद केले. कसोटीत 256 झेल आणि 38 स्टंपिंग केले आहेत.

बीसीसीआयने जर्सी निवृत्त करणारा धोनी सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या