Parliament Attack: संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांचा गोंधळ; लोकसभेतील आणि राज्यसभेतील ‘या’ खासदारांचे निलंबन

fifteen mp suspended in parliement

Parliament Attack नवी दिल्ली: सध्या संसदेचे हिवाळी अधिवेश सुरु आहे. काल म्हणजेच बुधवारी संसदेचे अधिवेशन सुरु असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन घुसखोरांनी प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर तिथे उपस्थित सदस्यांना घाबरवण्यासाठी त्या घुसखोरांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. अशा प्रकारे नवीन संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, आज लोकसभा अध्यक्षांनी एकूण १५ खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे.

बुधवारी लोकसभेच्या मुख्य सभागृहामध्ये चर्चासत्र सुरु असताना अचानक दोन लोकांनी घुसखोरी केली व धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे तेथील वातावरण भयभीत झाले. ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत घुसखोरांनी अध्यक्षांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये ते असफल झाले. तिथे आलेल्या घुसखोरांना उपस्थित असलेल्या खासदारांनी चांगलाच मार दिला व सुरक्षारक्षकांकडे सोपविले.

आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदेत येताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुरक्षेत झालेल्या चुकीवरून गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊन देखील घोषणाबाजी न थांबल्याने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या १४ खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले. तसेच राज्यसभेतील टीएमसीचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, काल संसदेच्या सुरक्षेत जी चूक झाली, त्यासंदर्भात ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागितली आहे.

कोणाचे झाले निलंबन ?

अध्यक्षांच्या सूचनेनंतरही विरोधक शांत न बसल्याने संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोंधळ घालत असलेल्या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर अध्यक्षांनी खासदारांचे निलंबन केले. निलंबन केलेल्या खासदारांमध्ये टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस, बेनी बेहानन, मोहम्मद जावे, पीआर नटराजन, कनिमोझी, व्हीके श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर व तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.