SA vs IND ODI Series | आफ्रिकेविरूद्धच्या ODI मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका; दिग्गज खेळाडू सामन्यातून बाहेर

Team India Star Player Ruled out series against south africa । IND Vs SA ODI series Live Streaming Details । IND Vs SA ODI series squad

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SA vs IND ODI Series | टीम इंडिया साऊथ आफ्रिका दौऱ्यावर आहे. T 20i मालिका संपली असून रविवारपासून ODI मालिका सुरु होणार आहे.  कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडीआयने T 20i मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली.

T 20i मालिका संपल्यानंतर 17 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. ODI मालिकेला सुरूवात होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

दीपक चहरने ( Deepak Chahar ) वैद्यकीय कारण सांगून ऑस्ट्रेलिया T20I मालिकेच्या मध्यावर भारतीय संघ सोडला होता. वृत्तानुसार, त्याच्या वडिलांची तब्येत बरी नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो ODI मालिकेचा भाग असेल असे बोलले जात होते परंतु त्याने  ODI मालिकेतुन आपले नाव मागे घेतले आहे.

दीपक चहरच्या जागी संघात आकाश दीप याचा समावेश संघात करण्यात आला आहे. त्यासोबतच श्रेयस अय्यर शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआने सांगितलं आहे. मात्र पहिल्या कसोटीनंत श्रेयस अय्यर कसोटी संघात सामील होणार आहे.

श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) अनुपस्थितीत, रजत पाटीदार गकेबरहा आणि पार्लमध्ये भारतासाठी क्रमांक 4 वर खेळणार आहे.

तसेच भारताचा हुकमी एक्का मोहम्मद शमीला कसोटी मालिकेतुन वगळण्यात आलं आहे. शमीच्या जागी कोण खेळणार याबाबत बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली नाही.

Where Will The ODI Match India Vs South Africa Be Played?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ODI सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

What Time Will The ODI Match Between India And South Africa Start?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ODI सामना सामना ४:30 वाजता सुरू होईल.

India Vs South Africa ODIs To Be Played Under New ICC Rule

नवीन नियमानुसार, गोलंदाजी संघाने त्यांच्या पुढच्या षटकाचा पहिला चेंडू मागील षटक संपल्याच्या ६० सेकंदांच्या आत टाकण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे, कारण स्टॉप क्लॉक षटकांमध्ये अनुमत वेळ मर्यादित करेल. एका डावात (दोन इशाऱ्यांनंतर) तिसर्‍यांदा असे न केल्यास, संघाच्या क्षेत्ररक्षणाला पाच धावांचा दंड आकारला जाईल.

IND Vs SA ODI series Live Streaming

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND Vs SA Live Streaming ) सामन्यांचे Live Streaming  Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर केले जाईल. तसेच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल.

India’s squad for the ODI series against South Africa

वनडेसाठी भारताचा संघ: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), प्रसीध कृष्णा.

Read Also –India Vs South Africa: Full Schedule, Squads And Live Streaming Details

महत्वाच्या बातम्या