Rohit Sharma | रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर सूर्याच्या ‘त्या’ ट्विटने मुंबई इंडियन्सची झोप उडाली; घेणार मोठा निर्णय

Broken Heart: Suryakumar Yadav's Cryptic Instagram Story After Rohit Sharma Removed As Captain Of Mumbai Indians Ahead Of IPL 2024

Rohit Sharma | IPL  2024 | आयपीएल 2024 सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे आला होता.

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्समध्ये परत आल्यानंतर रोहित शर्मा कडून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद काढून घेत हार्दिक पांड्या  ( Hardik Pandya ) कर्णधार पद दिले.

हार्दिक पंड्याला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स निषेध करत आहे तसेच मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) जर्सी जाळत आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारताचा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका ट्विटने लक्ष वेधले आहे. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा जिवलग मित्र आहेत. तसेच दोघेही मुंबई इंडियन्स साठी खेळायचे.

रोहितच्या नेतृत्वाखाली सूर्याने ( Suryakumar Yadav ) आयपीएलमध्ये सुरवात केली आणि त्यानंतर टीम इंडियामध्ये धमाकेदार एंट्री केली. यामुळेच सूर्यकुमार यादव रोहितचा खूप आदर करतो आणि त्याच्याबद्दल आपुलकीही आहे.

रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे, ज्याने आपल्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माचे कर्णधार पद गेल्याने सूर्यकुमार दुखी असल्याचे बोलले जात आहे.

Suryakumar Yadav has shared an emoji of broken heart

सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) ट्विटवर एक हृदय तुटलेले इमोजी शेअर केला आहे. यासोबत त्यांनी काहीही लिहिलेले नाही, मात्र त्यांचे चाहते या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमारला मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) कर्णधारपद द्यायला हवे होते. हार्दिक हा संघ सोडून गेला होता. या कारणाने त्याला द्यायला नको होते. असेही चाहते म्हणत आहेत.

दरम्यान, चाहत्यांचा विचार करत मुंबई इंडियन्स या निर्णयाचा फेरविचार करून मोठा निर्णय घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.