Quit Smoking | धूम्रपान सोडण्याचा विचार करताय? बघा, हे होतील फायदे!

Quit smoking and see the benefits

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Quit Smoking | धकाधकीच्या वेगवान जीवनात कामाच्या, नात्यांच्या, आयुष्यातील इतर प्रश्र्नंतून काही काळं सुटका म्हणून बरेच लोक तरुणपणातच धूम्रपानाकडे वळतात. सुरुवात “मला सवय नाहीये रे!” किंवा “मी कधी कधीच घेतो रे!” सारख्या कारणांपासून होते आणि हळू हळू शरीराचं खच्चीकरण झाल्यावर जाणवू लागतं, ही सवय सोडणं काही तितकं सोपं नाहीय. कदाचित सगळ्यात अवघड काम तेच आहे. जर तुम्हीही आयुष्यात त्या पायरीवर असाल जिथे तुम्ही ही सवय सोडण्याचा (Quit Smoking) विचार करता आहात तर वाचत रहा पुढे.

धूम्रपानामुळे आपल्या शरीरात प्रचंड त्रासदायक बदल होतात. एका सिगरेट क्या धुरात ७००० हून अधिक वेगवेगळी रसायने असतात. ज्यातील अडीचशे रसायने विषारी असतात. ज्यामुळे कॅन्सर, स्ट्रोक, हार्ट अटॅक सारखे रोग होऊ शकतात. तुमची वास घेण्याची, गंध ओळखण्याची, चव ओळखण्याची संवेदना कमी होऊ शकते. 

Quit smoking and see the benefits

वीस मिनिटांनंतर तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मल होते. आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.

बारा तासांनंतर तुमच्या शरीरातील सारी विषारी रसायने हळू हळू निघून जाऊ लागतात.

ब्लड प्रेशर आणखीन कमी होते, ज्यामुळे एका दिवसानंतर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढू लागते.

दोन दिवसांनी तुमची गंध आणि चव ओळखण्याची इंद्रिये पूर्ववत होऊ लागतात.

तीन दिवसांनी तुमच्या फुफ्फुसांची अवस्था सुधारित होते ज्यामुळे श्वसनप्रक्रियेत अडथळे कमी होतात.

आठवड्यात रक्ताभिसरण आणखीन सुधारते आणि तुमच्या मांसपेशींना चांगला रक्तपुरवठा होतो. 

एका महिन्याभारत खोकला दूर होतो, श्वसनप्रक्रिया सुधारते.

दोन महिन्यांनी तुमच्या फुफ्फुसांची क्षमता १० टक्के वाढते ज्यामुळे तुमच्या stamina मध्ये सुधार होतो.

धूम्रपान ही वाईट सवय आहे जी सोडल्याने फक्त फायदेच होतात. शरीराला झालेली हानी पूर्ण प्रमाणात तर भरून निघण्यास बराच कालावधी लागू शकतो, कदाचित ते अशक्य सुद्धा आहे. पण जितक्या लवकर ती सवय सुटेल तितके जास्त फायदे एखाद्याला बघायला मिळू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या: