High Court | पोरींनो सावधान, आता गोलीगत पोरांना धोका द्याल, तर जेलमध्ये जाल!

Partner cannot be held liable for abetment to suicide

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

High Court | प्रेम ही कल्पना आजच्या तरुण, तरुणींना फार हवीहवीशी वाटते. आपण कुणाच्या प्रेमात आहोत, ही कल्पनाच त्यांना सुखावत असते.

प्रेम सहजतेने होतं, पण ते निभवताना जी गडबड होते आणि मग त्यातून जे प्रश्न निर्माण होतात, यामुळे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते. प्रेम करण्याआधी ते आपण निभावू शकू का, याचा विचार व्हायला हवा.

समोरच्याच्या भावना आपल्यात गुंतताहेत हे लक्षात येताच त्या व्यक्तीला वेळीच सावध करा. प्रेम प्रकरणांत मुलेच मुलीला धोका देतात असे नाही काही प्रकरणांत मुलीही धोका देतात आणि त्यातून सावरण्याची क्षमता मुले हरवून बसतात.

प्रेमात एकमेकांना सोडून देण्याची ठराविक वेळ असते. ती एकदा ओलांडली की मग एकमेकांना सोडून देणे कठीण होते.

एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ टिकलेले प्रेम प्रकरण सोडण्यासाठी दोघांनी सोबत बसून एकमेकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यायला हवा. एकदम एकमेकांना तोडून टाकल्याने कुणा एकाचे मोठे नुकसान आणि नंतर दोघांचे नुकसान होऊ शकते.

शक्यतो प्रेम असे कुणावरही होत नाही आणि ते जर खरे असेल तर तोडण्याऐवजी ते शेवटास नेण्याचाच प्रयत्न झाला पाहिजेत. जेव्हा प्रेम तोडून चुकल्याची जाणीव होते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. एकमेकांसाठी जगण्याची वृत्ती फक्त प्रेमातच निर्माण होते.

दरम्यान असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे. ८ वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकराने आत्महत्त्या करून प्रियसी आणि तिच्या दोन भावांला जबाबदार धरले आहे. 

प्रियकराने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे त्या तरुणीवर आणि तिच्या दोन भावांवर ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३०६ अन्वये गुन्हा सिद्ध झाल्यास १० वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद कायद्यात आहे.

एखादी व्यक्ती जर कोणाच्या आत्महत्येसाठी जबाबदार असेल तर तिच्यावर कलम ३०६ लावण्यात येतो. कलम ३०६ अंतर्गत पोलीस विना वॉरंट एखाद्याला अटक करू शकतात.

प्रियकराने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले की, त्याचे या महिलेसोबत किमान 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीने त्याच्याशी असलेलं नातं तोडून दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं. बहिणीशी संबंध ठेवू नयेत म्हणून भावांनी आपल्याला धमकावलं होतं, त्यामुळे हे पाऊल उचलल्याचा आरोप प्रियकराने त्याच्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

यानंतर जिल्हा न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला. यानंतर तिघांनीही आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांविरोधात छत्तीसगड उच्च न्यायालयात ( High Court  ) धाव घेतली.

If a person commits suicide due to failure in love

छत्तीसगड उच्च न्यायालयाने ( High Court  ) प्रियसी आणि तिच्या भावांना दिलासा देत म्हंटल आहे कि,  जर एखाद्या व्यक्तीने प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या केली तर त्याच्या प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही.

सिंगल जज जस्टिस पार्थ प्रतिमा साहू यांनी सांगितलं की, जर एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत चांगले मार्क्स न मिळाल्याने आत्महत्या केली तर शिक्षकाला जबाबदार धरता येणार नाही.

न्यायमूर्ती साहू म्हणाले, ‘जर एखाद्या प्रियकराने प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या केली असेल, जर एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेतील खराब कामगिरीमुळे आत्महत्या केली असेल, जर एखाद्या क्लायंटने त्याची केस फेटाळल्यामुळे आत्महत्या केली असेल, तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अनुक्रमे प्रेयसी, परीक्षार्थी आणि वकील यांना दोषी धरता येणार नाही.

कमकुवत किंवा दुर्बल मनाच्या व्यक्तीने घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात इतर कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही’.

त्यानंतर न्यायालयाने ( High Court  ) 24 वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन भावांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रद्द केला. परंतु निर्दोष सुटे पर्यन्त त्यांना प्रचंड मानसिक त्रासातून तसेच जेलवारी सुद्धा करावी लागली आहे. म्हणून पोरीनो सावधान, आता गोलीगत पोरांना धोका द्याल, तर जेलमध्ये जाल!

महत्त्वाच्या बातम्या: