IND Vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा T20I सामन्यावर पावसाचे सावट; भारत T20I मालिका गमावणार? वाचा सविस्तर

Ind vs SA 3rd T20I Johannesburg weather Update

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND Vs SA : भारतीय संघ जोहान्सबर्ग येथे त्यांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळणार आहे. भारताविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिका T20I मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहेत. गकेबरहा येथे झालेला दुसरा T20 सामना दक्षिण आफ्रिके ५ विकेटने जिंकला होता.

डर्बनमधील किंग्समीड येथे झालेल्या पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. दुस-या T20 सामन्यांतही पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.

दुस-या T20 सामन्यांत भारतानेने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकांत 180/7 धावा केल्या. त्यानंतर मध्येच पाऊस आला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 15 षटकांत 153 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. भारतासाठी रिंकू सिंगने सूर्यकुमार यादवसोबत 68 धावांची नाबाद खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 13.5 षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. रीझाने 17 चेंडूत 49 धावा केल्या. दरम्यान, भारताकडून मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या.

India vs South Africa 3rd T20I Johannesburg Weather Report

जोहान्सबर्ग येथे दिवसा हवामान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे. दिवसा पावसाची शक्यता नाही परंतु संद्याकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे,दक्षिण आफ्रिकेचा जोहान्सबर्ग येथील खेळपट्टीवर चांगला रेकॉर्ड आहे, कारण त्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये 65.98 टक्के सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्धचा दुसरा T20 सामना गमावल्या नंतर टिळक वर्मा म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत खेळणे नेहमीच चांगले असते; ते खूप आव्हानात्मक आहे. आम्ही या परिस्थितीसाठी चांगली तयारी केली आहे आणि आम्ही खरोखर कठीण परिस्थितीत चांगली फलंदाजी केली आहे.”

हे वाचा –

IND Vs SA Live Streaming । तिसरा T20I सामना मोफत पाहण्यासाठी बातमी वाचा

महत्वाच्या बातम्या