Animal | संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल चित्रपटाने कमवला 800 कोटींचा गल्ला; वाचा पूर्ण माहिती

Animal Box office collection to reach 800 crore

Animal | ॲनिमल हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 13 दिवस उलटले. तरीही कोणत्या न कोणत्या कारणाने हा सिनेमा लोकांच्या चर्चेत आहेच. टोकाची मर्दानी भूमिका, स्त्रीचं बुजरं अस्तित्व, पॉर्न सारखी काम करणारी हिंसा या साऱ्या मुद्द्यांवरून वांगा रेड्डीची (Sandeep Reddy Wanga) ही फिल्म चर्चेत राहिली.

पहिल्या दिवसापासूनच भारतभरातील प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. एखाद्या दिग्दर्शकाच्या सुप्त इच्छांचं प्रगटन मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी प्रेक्षक ह्या सिनेमाला भेट देत राहिला. आज ही फिल्म स्क्रीन वर झळकताना तेरा दिवस उलटले आहेत. तरीही या सिनेमासाठी भारत भरात आणि जगभरातही मिळणारा प्रतिसाद कायम आहे.

सिनेमा स्त्रीपुरुष संबंध, पुरुषी अहंकार, आणि हिंसा याबाबत वक्तव्य करताना समस्याग्रस्त वाटत असला तरीही त्याची लोकप्रिय असण्या मागची कारणे लक्ष देऊन निरखण्यासारखी आहेत. अलीकडे आलेल्या ‘टॉक्सिक फेमिनिझम’ च्या लाटेचं एक रिअँक्शन म्हणून असा नायक भारतीय सिनेमामध्ये जन्म घेतोय का, हा सुद्धा विषय विचार करण्यासारखा आहे.

Animal box office collection day 13

सामाजिक कारणं काहीही असोत, पण एक नक्की की, या सिनेमाने लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. आणि ते करण्यासाठी रेड्डीने वापर केलाय आपल्या ‘स्ट्राँग सिनेमॅटिक क्राफ्ट’ चा. 

सिनेमाची सुरुवात झाल्यापासून प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतो. सिनेमाचं एडिट आणि संगीत क्षणभरासाठीही उसंत न देता सतत गुंतवून ठेवतं. त्यातच लिहिले गेलेले भेदक संवाद आणि ज्या पद्धतीने अभिनेते ती वाक्य उचलून धरतात, ते बघून अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही.

एखादं पात्र जेव्हा कथानकावर कुरघोडी करतं तेव्हा कथा सैल होत जाते, याची प्रचिती आपल्याला सिनेमाच्या दुसऱ्या हाफमध्ये लगेच येते. पण कथेचा पाय मुरगळला तरीही रणबीर (Ranbir Kapoor) त्याच्या बलदंड प्रतीमेनिशी प्रेक्षकांच्या मनावर आपलं नाव कोरतोच.

Animal Box Office collection Day 13: Ranbir Kapoor’s movie

या सिनेमाने प्रेक्षक, समीक्षक वर्गाचा तुकडा पाडण्याचे काम सहजरीत्या केलेले आहे. काही जण चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत तर काही जण यावर टीकास्त्र झोडत आहेत. त्यामुळे  ॲनिमल (Animal) च्या तिकिटासाठी प्रेक्षकांची रीघ आजही कायम आहे. तेराव्या दिवशी या फिल्मने जगभरात ७५७ कोटी कमावले असून, लवकरच ही फिल्म ८०० कोटींच्या घरात प्रवेश करेल यातही काही दुमत नाही!

महत्त्वाच्या बातम्या:

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.