Ravindra Berde | सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; कॅन्सर सोबत लढताना घेतला अखेरचा श्वास.

Ravindra Berde passes away at 78

Ravindra Berde | वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात काम सुरू केलेले, झपाटलेला, धडाकेबाज सारख्या मराठी चित्रपटांपासून ते सिंघम सारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे, लक्ष्मीकांत बर्डे यांचे सख्खे भाऊ, सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचे मंगळवारी (ता. १२) रोजी मध्यारात्री निधन झाले.

लक्ष्मीकांत बर्डे सोबत बऱ्याच सिनेमांमध्ये निरनिराळ्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या विनोदी अभिनयाची छाप पाडली होती. चंगूमंगु, हमाल दे धमाल, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, झपाटलेला, धडाकेबाज, भुताची शाळा या सिनेमांमध्ये आपल्याला त्यांची विनोदी पण तितकीच संवेदनशील अभिनयशैली निरखता येते.

हृदयविकाराचा त्रास त्यांना बराच आधीपासून होता. त्यात काही वर्षांपासून त्यांना गळ्याच्या कॅन्सरने ग्रासले होते. २०११ मध्ये त्यांच्या कॅन्सरचे निदान झाले. पण तसे असूनही त्या व्याधीचं पूर्णपणे निवारण झालं नाही. तेव्हापासून त्यांची त्या कर्करोगासोबत लढत सतत सुरूच होती.

टाटा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर दोन दिवसांनी अचानक आलेल्या हृदविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे प्राण दगावले. रवींद्र बेर्डे यांच्या मागे त्यांच्या पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असे कुटुंब आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.