Old Pension Scheme | सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपाचा इशारा

Old pension scheme update, Maharashtra government workers will go on strike

Old Pension Scheme | २००५ मध्ये लागू झालेली नवी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) रद्द करून जुनी योजना पुन्हा अंमलात आणावी अशी मागणी पुढे ठेवत राज्यभरातून एकत्र आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा (Government Workers) विराट मोर्चा नागपूर विधानभवनावर जाऊन धडकला. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर १४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme)

जुन्या पेन्शन योजने अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला शेवटच्या पगाराच्या ५० टक्के रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जाते.  महागाई भत्ता वाढला म्हणजे या पेन्शनच्याही रकमेत वाढ होते, आणि कर्मचाऱ्याच्या निधनानंतर ही रक्कम त्याच्या बायकोस मिळते.

नवी निवृत्तीवेतन योजना (New Pension Scheme)

नव्या पेन्शन योजने अंतर्गत पूर्ण वेतन आणि महागाई भत्ता रकमेतील १० टक्के रक्कम सरकार आपल्या जवळ ठेवते. यांची गुंतवणूक Pension Fund Regulatory and Developement Authority (PFRDA) द्वारे आधिकृत फंडस् मध्ये केली जाते. या रकमेवरील व्याज व परताव्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते.

जुन्या पेन्शन योजनेचे फायदे लक्षात घेऊन राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, पुन्हा तीच योजना अमलात आणावी अशी मागणी करत आहेत. पण ती योजना अमलात आणली म्हणजे राज्याच्या तिजोरीवरील भार जवळ जवळ साडेचार पटींनी वाढणार आहे.

कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची धार दाखवल्यानंतर त्यांच्या मागण्यांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद दर्शवण्यात येत आहे. तर राजपत्रित अधिकारी या संपाबाबत १२ डिसेंबरला निर्णय घेतील.

महत्त्वाच्या बातम्या:

Maratha Reservation | मराठा-ओबीसी समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा, महाराष्ट्र पेटता ठेऊ नका

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांना सत्तेचा माज आलाय

Maratha Reservation | मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्याच्या पापाचे वाटेकरी भाजप सरकार

Sachin Anarthe | सचिन अनार्थे यांची भा.ज.प. चित्रपट आघाडीच्या ‘चित्रपट निर्मिती प्रमुख’ पदी नियुक्ती

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.