Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना कधी बंद झाली आणि कोणी बंद केली? नक्की वाचा !

Old Pension Scheme | टीम महाराष्ट्र देशा: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. या संपाचा परिणाम सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. जुनी पेन्शन योजना हे नाव सातत्याने ऐकायला मिळत आहे. नक्की काय आहे ही योजना? जाणून घेऊया.

नक्की काय आहे जुनी पेन्शन योजना? (What exactly is Old Pension Scheme?)

सरकारी संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्यांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पेन्शन दिली जाते. 2004 पर्यंत जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत (Old Pension Scheme) सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला पगाराच्या 50 टक्के म्हणजेच निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जात असे. कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर ही रक्कम त्याच्यामागे असलेल्या पती-पत्नीला मिळायची. 2005 साली ही योजना बंद करण्यात आली.

जुनी पेन्शन योजना कोणी बंद केली? (Who closed the old pension scheme?)

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 31 ऑक्टोबर 2005 रोजी सुलतानी जीआर काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी शिक्षक सहित इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन (Old Pension Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या जीवनातील खूप महत्त्वाची बाब आहे. कारण निवृत्तीनंतरच्या जीवनाचा आर्थिक आधार म्हणून पेन्शनकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत 31 ऑक्टोबर 2005 रोजी शासनाने कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील ही महत्त्वाची बाब हिरावून घेतली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2005 साली ही योजना बंद केली होती. त्यानंतर तब्बल 9 वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार सत्तेत राहिले होते. या कालावधीमध्ये या विरोधात एकही आंदोलन झाले नव्हते. त्यानंतर भाजप सरकार सत्तेत आल्यावर शिक्षक संघटना आणि इतर संघटनांनी आंदोलन करायला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलचं तापलं आहे.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करत आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहे. या संपाचा सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.