Amol Mitkari | भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अमोल मिटकरींची भाजप-शिंदे गटावर बोचरी टीका

Amol Mitkari  | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरूच असतात. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका टिप्पणी करतच असतात. हे राजकारणात काही नवीन नाही. काल उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावरून आता राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी भाजप-शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले आहेत.

काय म्हणाले मिटकरी? (What Did Say Amol Mitkari?) 

देसाईंच्या मुलाने शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावरून भाजपच्या नेत्यांनी या प्रवेशावर आक्षेप टाकला. याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी टीव्ही ९मराठी’शी बोलताना म्हणाले, “देसाईंच्या मुलाला जर भ्रष्टाचारी म्हणत असाल तर  आणखीन काय पुरावा हवा? कारण भाजपचे नेते राजा हरिश्चंद्र आहेत. त्यामुळे त्यांनी शिक्कामोर्तब केला असेल तर ते नक्की खरं असेल त्यामुळे आता त्यांना पक्षात ठेवायचं कि नाही हे मुख्यमंत्र्यांवर आहे.” असे टीकेचे बाण अमोल मिटकरींनी भाजप-शिंदे गटावर सोडले.

जुन्या पेन्शनबाबत मिटकरींचं भाष्य  (Amol Mitkari Talk About old Pension Yojana)

जुन्या पेन्शनबाबत देखील मिटकारींनी भाजप-शिंदे गटाला टार्गेट केलं आहे. ते म्हणाले कि, “कालपर्यंत हे सरकार १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक होते. परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. परंतु जुनी पेन्शन सुरु करण्याच्या मानसिकतेत हे सरकार नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा रोष वाढत आहे”,असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी भाजप-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या