Summer Skin Care | उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी करा ‘या’ टिप्स

Summer Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण धूळ आणि प्रदूषणासोबतच उन्हामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक महागडे क्रीम आणि लोशन वापरतात. मात्र, हे क्रीम आणि लोशन त्वचेची दीर्घकाळ काळजी घेऊ शकत नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील सोप्या टिप्स फॉलो करू शकतात. या टिप्स फॉलो केल्याने उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा निरोगी राहू शकते.

सनस्क्रीनचा वापर करा (Use sunscreen-Summer Skin Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन आपल्या त्वचेची सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. त्याचबरोबर याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावणे उपयुक्त ठरू शकते.

शरीर हायड्रेट ठेवा (Keep the body hydrated-Summer Skin Care)

या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा शरीर हायड्रेट राहते तेव्हा तुमची त्वचाही हायड्रेट राहते. चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दररोज 8 ते 10 ग्लास पाण्याचे सेवन केले गेले पाहिजे. माफक प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहू शकते.

व्यायाम करा (Do exercise-Summer Skin Care)

उन्हाळ्यात शरीरातील उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्याचबरोबर नियमित व्यायाम केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊ शकतात.

चेहरा स्वच्छ ठेवा (Keep your face clean-Summer Skin Care)

उन्हाळ्यामध्ये घाम, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावरील चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी चेहरा स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी क्लिंजरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करावा लागेल.

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर या ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी तुम्ही खालील पेयांचे सेवन करू शकतात.

ताक (Buttermilk-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण उष्णतेवर मात करण्यासाठी ताक एक सर्वोत्तम उपाय आहे. उन्हाळ्यात नियमित ताकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ताक तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

नारळ पाणी (Coconut water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ज्यांना उन्हाळीचा त्रास सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरू शकते. नारळ पाण्याचे सेवन केल्याने उन्हाळी लागण्याची समस्या कमी होऊ शकते. त्याचबरोबर नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे या उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचे सेवन करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन देखील वाढते. त्याचबरोबर उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button