Job Opportunity | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) दिल्ली यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB), दिल्ली यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 163 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये शास्त्रज्ञ ‘बी’, सहाय्यक कायदा अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, फील्ड अटेंडंट आणि मल्टी-टास्किंग कर्मचारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार ‘परिवेश भवन’, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली-110032

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1Tq3Z6ijeNiLkbsVndhbTj_3Ft2LEiaYH/view

अधिकृत वेबसाईट

https://cpcb.nic.in/

महत्वाच्या बातम्या