Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. अशा परिस्थितीत पुढील 48 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कारण या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरवून घेतला आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी (Yellow alert of rain issued in ‘these’ districts)

मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडांसह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा कांदा, मक्का, फळबागा आणि भाजीपाल्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना दिसत आहे.

मुंबईसह कोकणातील वातावरणात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज (Weather Update) हवामान करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, येत्या तीन दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या