Subhash Desai | ठाकरे गटाला मोठा धक्का; भूषण देसाईंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Subhash Desai | मुंबई : शिवसेनेमध्ये गेल्या 8 महिन्यांपूर्वी मोठी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तेत असतानाही 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. 40 आमदारांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षाला मोठं भगदाड पडलं.

40 आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर अद्यापही ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का देणारी राजकीय घडामोड घडली आहे.

भूषण देसाईंचा उद्धव ठाकरेंना रामराम

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे सुपुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे.

Subhash Desai’s son Bhushan Desai joined the Shinde group’s Shivsena

उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्या अनेक नेत्या, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यातच आता सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई आज एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित बाळासाहेब भवनात पक्षप्रवेश केला आहे. भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-