Sanjay Raut | “तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका”; ‘त्या’ व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा सोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी सोशल मीडियावरील ‘मातोश्री’ नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन ‘संबंधित व्हिडिओत तथ्य आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा’, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.

“तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका”

“मला या व्हिडीओबाबत काही माहिती नाही. आज सकाळी असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. पण या व्हिडिओशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचं राज्य नाही”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“तो व्हिडीओ खरा असेल तर म्हात्रेंवर गुन्हा दाखल करा”

“कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, याचा आमच्याशी संबंध नाही. पण सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत. व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करा. तो व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा तर गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

“लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहतात”

“राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही”, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

Ajit Pawar talk about Sheetal Mhatre’s viral video

“कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे”, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-