MNS Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा…

MNS Dilip Dhotre | सोलापूर : टीम महाराष्ट्र देशा- पंढरपूर तुळशी वृंदावन येथील संत चोखामेळा (Sant Chokhamela) यांचे मंदिर पडून आठ दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे, येथे आठ दिवसात जर मंदिराचे काम सुरु न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे (MNS leader Dilip Dhotre) यांनी दिला.

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा – MNS leader Dilip Dhotre

गेल्या तीन वर्षांपूर्वी पंढरपुरात या तुळशी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी विविध संतांची मंदिरे देखील बांधण्यात आली होती. मात्र अवघ्या तीन वर्षातच मंदिर पडत असेल तर ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे केले असेल याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबतचे निवेदन पंढरपूर येथील वनअधिकारी चैताली वाघ (Pandharpur Forest Officer Chaitali Wagh) यांना देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे शहराध्यक्ष संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर, नागेश इंगोले, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप भोसले, अवधूत गडकरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

महत्वाच्या बातम्या – 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.