Share

NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

🕒 1 min read NCP Leader | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आदिवासी व्यक्तीच्या (Tribal people) नावावर बनावट कर्ज दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपये परस्पर लाटून, त्याची फसवणूक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) सोलापूरातील एका बड्या नेत्यासह अन्य दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा ( Atrocity Case ) दाखल करण्यात आला … Read more

Published On: 

🕒 1 min read

  • NCP Leader | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा-

नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आदिवासी व्यक्तीच्या (Tribal people) नावावर बनावट कर्ज दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपये परस्पर लाटून, त्याची फसवणूक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) सोलापूरातील एका बड्या नेत्यासह अन्य दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा ( Atrocity Case ) दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र पुंडलिक हजारे (रा. लोकमंगल विहार,  बाळे, सोलापूर), अमर विजय जाधव (रा. नेरूळ, नवी मुंबई), यशवंत वसंतराव पाटील (रा. अलीदादा इस्टेट, कुर्ला, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितां ची नावे असून राजेंद्र हजारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकार विभागाचे राज्य उपाध्यक्ष (State Vice President of Cooperative Department of NCP) आहेत. तसेच ते जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे प्रमुख देखील आहेत.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, आदिवासी व्यक्तींच्या नावावर असलेल्या जमीनी आदिवासी व्यतिरिक्‍त इतर कोणत्याही  व्यक्तींना लिलावा शिवाय थेट खरेदी करता येत नाहीत. पालघर जिल्ह्यातील अमृत केशव पडवळे हे आदिवासी जमातीचे असल्याची संपूर्ण माहिती राजेंद्र हजारे यांना आहे. त्यामुळे त्यांनी पडवळे यास सन २०१४ मध्ये प्रथम नोकरी लावतो, महिना २५ हजार रुपये देतो, कंपनीचा डायरेक्टर करतो असे आमिष दाखवून कर्जत, डहाणू, चिंचलखैरे येथील आदिवासी व्यक्तींच्या जमिनी अमृत पडवळे यांच्या नावावर कमी पैशाने खरेदी केल्या.

अमृत पडवळे यांच्या नावे तब्बल १ कोटी १० लाखांचे कर्ज परस्पर मंजूर 

या जमिनी कमी पैशात लिलावाद्वारे खरेदी करता याव्यात, यासाठी राजेंद्र हजारे यांनी अमृत पडवळे च्या नावावर खरेदी केलेल्या आदिवासी जमिनीवर पडवळेच्या नावे कागदपत्रात नियमबाह्य पद्धतीने चुकीच्या नोंदी करून स्वतःच्या मालकीच्या असलेल्या जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सोलापूर या बँकेकडून अमृत पडवळे च्या नावे तब्बल १ कोटी १० लाखांचे कर्ज परस्पर मंजूर केले. त्यानंतर या कर्जाची रक्‍कम बनावट विड्रॉल स्लिप व बनावट रक्‍कम हस्तांतरण पत्राच्या आधारे यशवंत पाटील यांच्या बँक खात्यात पडवळे यांच्या परस्पर जमा केली. तसेच कर्जत येथील जमिन कमी पैशात लिलावाद्वारे विकत घेण्यासाठी हे कर्ज प्रकरण ‘एनपीए’ करून त्याच्या अंमलबजावणीसाठी पडवळे यांना पनवेल दिवाणी न्यायालयाची नोटीस देखील पाठविली. व कधीही न घेतलेले १ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी पडवळे यांच्यावर दडपण आणून त्यांची फसवणूक केली.

गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे (Deputy Commissioner of Police Pranjali Sonwane) या करीत आहेत

या प्रकरणी अमृत केशव पडवळे (रा. रामपूर-खेडपाडा, ता- डहाणू, जि. पालघर) यांनी सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र हजारे व त्यांचे साथीदार अमर जाधव व यशवंत पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र हजारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उच्च पदस्थ पदाधिकारी असल्यामुळे अद्याप पर्यंत त्यांना अटक झाली नसल्याचे समजते. या गुन्ह्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे (Deputy Commissioner of Police Pranjali Sonwane) या करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

[emoji_reactions]

Crime Finance Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या