Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde | मुंबई : राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने चिंतेत आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.

“खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Eknath Shinde announcement of Rs 300 per quintal subsidy for onion

“कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा

“देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-