Ajit Pawar | “जिकडे मुख्यमंत्री तिकडे शंभूराज, बॉडीगार्डसारखी पाठच सोडत नाहीत”; अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar | मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशानमध्ये आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अर्थव्यव्यस्था आणि सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करताना राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी बोलताना अजित पवारांनी ठाकरे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनाही सुनावलं आहे.

‘अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी शिवसेना मंत्र्यांच्या खात्यांना 34 टक्के निधी देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी भाजप मंत्र्यांना 66 टक्के निधी देण्यात आला आहे,’ असं अजित पवार सांगत असतानाच शंभूराज देसाईंनी त्यांचं लक्ष विचलिच केलं. त्यावरुन अजित पवारांनी शंभूराज देसाईंना खडेबोल सुनावले आहेत.

40 आमदारांना सांभाळायला निधीची अक्षरश: नुसती उधळण सुरु आहे. 288 आमदारांपैकी फक्त 40 आमदारांचंच सरकार आहे की काय हे असा प्रश्न पडतो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar criticize Shambhuraj Desai

“शंभूराज, शंभूराज.., जिथं जिथं मुख्यमंत्री जातात तिथं तिथं आमचे शंभूराज असतात… ते बॉडीगार्डसारखी त्यांची पाठच सोडत नाहीत. मी बोलतोय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी.. जरा आम्हाला बोलू द्या.. अडिच वर्षे आम्ही जवळ बसायचो”, असं म्हणत अजित पवारांनी शंभूराज देसाईंना सुनावलं आहे.

“राजकीय घडामोड, सत्ताबदल, दुलर्क्षामुळे चालू अर्थसंकल्पात विकासकामांच्या निधीपैकी आतापर्यंत 52 टक्के रक्कम खर्च झाली. यापैकी योजनांवर फक्त 40 टक्के खर्च झालेला आहे. हे या सरकारचं मोठं अपयश आहे”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर तोशेरे 

“फडणवीस यांनी तुकोबांच्या ओव्यांचा आधार घेतला, त्यामुळे मी ही अर्थसंकल्पाचे तुकोबांच्या शब्दांमध्ये वर्णन करतो. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. जेवोनिया तृप्त कोण झाला? हा अर्थसंकल्प म्हणून केवळ घोषणांचा पाऊस पाडला, यातून जनतेला दिलासा मिळणार नाही”, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar Criticize state Government 

राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेना मंत्र्यांकडून अनेकवेळा त्यांच्या खात्यांना कमी निधी दिला जातो, तर सर्वाधिक निधी राष्ट्रवादीला दिला जातो, असा आरोप केला जायचा. यावरूनही शिवसेना नेत्यांनी आणि मंत्र्यांनी तेव्हाचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर उघड नाराजीही व्यक्त केली होती. आता अजित पवारांनी विरोधी पक्षनेते म्हणून याच मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

“आम्हाला पंचामृत, शिंदेंना प्रसाद आणि भाजपवाल्यांना महाप्रसाद”

“अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, योजना पुढं गेल्या पाहिजेत, याची काळजी अर्थमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. मागील वर्षी ‘पंचसुत्री’च्या आधारावर अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘पंचामृत’ असं नाव दिलं. कुठेही गेले की थोडेसे ‘पंचामृत’ देतात. ते झाल्यावर प्रसाद देतात. म्हणजे आम्हा सर्वांना ‘पंचामृत’ दिलं. एकनाथ शिंदेंच्या गटाला प्रसाद दिला. प्रसादानंतर जेवण असतं, ते भाजपवाल्यांना पोटभरून दिलं आहे. भाजपवाल्यांना महाप्रसाद, एकनाथ शिंदेंना प्रसाद आणि आम्हाला थोडं, थोडं पंचामृत देण्यात आलं,” अशी टोलेबाजी अजित पवारांनी सभागृहात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-