Aaditya Thackeray | “त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं”- आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray | मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आज मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे. “मला एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आवडते. मी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय खूप आधीच घेतला होता आणि त्याची माहिती वडिलांना दिली होती”, असं पक्षप्रवेशावेळी भूषण देसाई म्हणाले आहेत. यावर आता माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं त्यांनी जरूर जावं”

“भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांनी जरूर जावं. सुभाष देसाई हे आमच्यासोबत आहेत. चोवीस तास ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही त्यांना जिथे कुठे जायचं आहे त्यांनी जावं”, अशी आदित्य ठाकरेंनी पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

Aditya Thackeray criticizes Bhushan Desai’s party entry

सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो आहे. मात्र यावर बोलताना आदित्य ठाकरे “आम्हाला काही धक्का वगैरे नाही. ज्यांना जायचं त्यांनी जावं. सुभाष देसाई आमच्यासोबतच राहणार”, असं म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-