Summer Food | उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Summer Food | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासोबतच शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक असते. कारण जेव्हा शरीर हायड्रेट असते तेव्हा तुम्ही ऊर्जावान आणि ताजतवाने राहू शकतात. उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचे सेवन करू शकतात. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीर थंड राहते आणि आरोग्यही निरोगी राहते. उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करू शकतात.

काकडी (Cucumber-Summer Food)

काकडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि विटामिन ए आढळून येते. त्याचबरोबर काकडीचे नियमित सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. काकडी उन्हाळ्यात होणाऱ्या उष्माघातापासून संरक्षण करू शकते. त्यामुळे या वातावरणात काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

टरबूज (Watermelon-Summer Food)

उन्हाळ्यामध्ये टरबूज सर्वांच्याच आवडीचे असते. टरबूजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे टरबुजाचे सेवन केल्याने शरीर जास्त काळ हायड्रेट राहू शकते. त्याचबरोबर टरबूज खाल्ल्याने शरीराला थंडावाही मिळतो. टरबुजाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते.

दही (Curd-Summer Food)

दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये माफक प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन, फायबर आणि विटामिन बी 12 आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दह्याचा समावेश करू शकतात. दह्याचे सेवन केल्याने शरीर थंड आणि हायड्रेट राहते.

उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही वरील पदार्थांचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खालील ड्रिंक्स सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

ताक (Buttermilk-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण उष्णतेवर मात करण्यासाठी ताक एक सर्वोत्तम उपाय आहे. उन्हाळ्यात नियमित ताकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ताक तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

नारळ पाणी (Coconut water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ज्यांना उन्हाळीचा त्रास सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरू शकते. नारळ पाण्याचे सेवन केल्याने उन्हाळी लागण्याची समस्या कमी होऊ शकते. त्याचबरोबर नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे या उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचे सेवन करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन देखील वाढते. त्याचबरोबर उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या