Sachin Anarthe | सचिन अनर्थे यांची भा.ज.प चित्रपट आघाडीच्या ‘चित्रपट निर्मिती प्रमुख’ पदी नियुक्ती

Sachin Anarthe has been appointed as the film production chief of BJP Film Aghadi

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sachin Anarthe | भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीचा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ तसेच नवनियुक्त प्रदेश कार्यकारीणीची बैठक सोमवार दि. ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालय, नरीमन पॉईंट, मुंबई येथे पार पडली.

या कार्यक्रमात श्री.सचिन श्रीराम अनार्थे यांची “चित्रपट निर्मिती प्रमुख” पदी नियुक्ती करण्यात आली सदर कार्यक्रमास श्री. विक्रांतजी पाटील, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांची विशेष उपस्थिती होती. मा. विजयभाऊ हरगुडे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकारीणीला विशेष मागदर्शन केले.

श्री. समीर दीक्षित भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा संलग्न चित्रपट आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांनी याप्रसंगी नवनियुक्त कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा, अभिनेत्री किशोरी शहाणे, नाटक निर्माते व समाज सेवक अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते-आयटी प्रोफेशनल सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे, निधी सल्लागार सदानंद शेट्टी, कायदा तज्ज्ञ जुबी मॅथ्यू , प्रभारी श्री. सत्यवान गावडे, सरचिटणीस प्रीति जोसेफ विक्टर, सरचिटणीस गीतांजली ठाकरे, सरचिटणीस संचित यादव, श्री. शौकतखा रज्जाकखा पठाण, चंद्रकांत विसपुते इ. मान्यवर मंडळी उपस्थित होती.

धनश्री दामले यांनी निवेदन केले याप्रसंगी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीमध्ये प्रवेश केला. अभिनेत्री किशोरी शहाणे यांची वरीष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या: