IND VS ENG – भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ सज्ज; मात्र भारतीय संघाची मोठी बातमी समोर

IND VS ENG | England tour of India, 2024 schedule, live scores and results | IND VS ENG TEST Series

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND VS ENG | २५  जानेवारी २०२४ पासून इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध भारत ( IND VS ENG ) यांच्यात ५ कसोटी सामने रंगणार आहेत. कसोटी सामन्यांची सुरवात हैदराबाद येथून २५ जानेवारीला होईल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचा कसोटी संघ जाहीर केला आहे.

जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या पाच कसोटी मालिकेसाठी (IND VS ENG TEST Series ) 16 खेळाडूंची घोषणा इंग्लंडने केली आहे. त्यांच्या संघात वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन, फिरकी गोलंदाज टॉम हार्टले आणि शोएब बशीर यांचा हि समावेश करण्यात आला आहे.

ऍटकिन्सनने या वर्षी पाच सामन्यांमध्ये 20.20 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत. भारतात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान तो इंग्लंडच्या संघाचा सदस्य होता.

इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे तर ऑली पोप उपकर्णधार असणार आहे. इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2024 ) मध्ये बेन स्टोक्स खेळणार नाही आहे.

लेग-स्पिनर रेहान अहमद  हि इंग्लंड संघाचा भाग बनला आहे त्याने पाकिस्तानविरुद्ध मोठी कामगिरी केली होती. रेहान अहमद हा सर्वात तरुण खेळाडू कसोटी पदार्पण करणारा ठरला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

एकीकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ( IND VS ENG ) त्यांच्या संघाची घोषणा केली अशी तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. काल झालेल्या दुसया T20i सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने ५ विकेट ने कालचा सामना जिंकला.

काल झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल ( 0 धावा ) आणि शुभमन गिलला ( 0 धावा ) चांगली कामगिरी करता आलेली नाही तसेच भारतीय गोलंदाज हि विशेष काही करू शकलेले नाहीत. मोहंमद सिराजला गोलंदाजीमध्ये लय मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षण कालच्या सामन्यात खराब झाले.

England squad For The Test Series Vs India ( IND Vs ENG)

इंग्लंड संघ | बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट , मार्क वुड. (IND VS ENG TEST Series )

IND VS ENG TEST Series Scheduled ( India Vs England Test Series )

सामना तारीख स्थळ
पहिली कसोटी २५-२९ जानेवारी हैदराबाद
दुसरी कसोटी २-६ फेब्रुवारी विशाखापट्टनम
तिसरी कसोटी १५-१९ फेब्रुवारी राजकोट
चौथी कसोटी २३-२७ फेब्रुवारी रांची
पाचवी कसोटी ७-११ मार्च धर्मशाळा

महत्वाच्या बातम्या