Drugs Seizure | रायगड पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल ३२५ कोटींचे अमली पदार्थ जप्त

Big operation of Raigad police, seized drugs worth 325 crores

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Drugs Seizure| Navi Mumbai: शुक्र. (ता. ८) रायगड पोलिसांनी (Raigad Police) अमली पदार्थप्रकरणात कमल जेस्वानी (Kamal Jeswani), मतीन शेख (Matin Sheikh) आणि अँथनी कुरुकुट्टीकरन (Anthony Kurukuttikaran) या  तीन आरोपींना अटक केली. खोपोली इथल्या फॅक्टरी मधून जवळ जवळ १०७ कोटींचे ड्रग्स त्या वेळी जप्त करण्यात आले.

या तिघांची विचारपूस केल्यानंतर झालेल्या खुलास्यानंतर पोलिसांनी होनाड गावातील एका गोडाऊन मध्ये आणखीन एक छापा (Police Raid) मारला. या छाप्यात वाढीव १७५ किलो एमडी (MDMA drug bust), ज्याची किंमत तब्बल २१८ कोटी आहे, जप्त करण्यात आली.

यातील काही ड्रग्स परदेशात निर्यात केल्याची कबुली आरोपींनी दिली.

जानेवारी महिन्यापासून मॅन्यूफॅक्चरींग युनिट जानेवारी महिन्यापासून आरोपींनी भाडेतत्वावर घेऊन ठेवले होते. गोडाऊन मध्ये सापडलेले अमली पदार्थ तिथे जवळ जवळ दोन महिन्यांपासून साठवले होते.

या सगळ्या प्रकारचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा ‘इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मनुफॅक्चरींग,’ या नावाक्या कंपनी मध्ये रसायनांच वापर होतोय असे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. या बाबतीत आणखीन तपास केला असता अंचल  केमिकल्स या एका शंकास्पद कंपनीचे नाव समोर आले. फॅक्टरी मधील रसायानांची चाचणी घेतल्यावर ती एमडी (MD) आहे हे उघड झाले.

३२५ कोटींचा हा मुद्देमाल नाताळ आणि येत्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमी ध्यानात घेऊन निर्माण केला असावा असा तर्क पोलीस खात्याने दिला.

महत्त्वाच्या बातम्या:

Indian Premiere League 2024 – लिलावात केदार जाधवला नापसंती? वाचा नापसंत खेळाडूंची यादी

IPL 2024 | वाचा संघांची यादी, कर्णधार, मालक, बजेट, आयपीएल सुरू होण्याची तारीख

Indian Premiere League Teams List 2024 – वाचा IPL सामन्यांच्या तारखा, संघांची यादी आणि खेळाडूंची नावे

IPL 2024 Auction KKR – गौतम गंभीरसह ‘हे’ दिग्गज खेळाडू कोलकाता नाईट रायडर्स मध्ये खेळणार; वाचा खेळाडूंची यादी