National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीसाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.), ऍनेस्थेटिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, ऑर्थोपेडिक्स सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेत्ररोग तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, हृदयरोग तज्ञ आणि ईएनटी सर्जन, डायलिसिस तंत्रज्ञ, वैद्यकीय तंत्रज्ञ, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर ), आयुष वैद्यकीय अधिकारी (PG), ऑडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी RBSK (UG) पुरुष, वैद्यकीय अधिकारी RBSK (UG) महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (National Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

दिनांक 11 आणि 12 मे 2023 रोजी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या मुलाखतीकरता (National Health Mission) स्वखर्चाने हजर राहणे अपेक्षित आहे. उमेदवारांना या मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1KxdMYj5K7FEGlcNatCALMlmd8YMUfwcI/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://raigad.gov.in/en/

महत्वाच्या बातम्या