Sharad Pawar | शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया “या” तारखेला घेणार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण असणार याचा निर्णय

Sharad Pawar | कालपासून ( 2मे ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा राजीनाम्याची निर्णय मागे घेणार का? कोण असणार नवीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. तर आता शरद पवारांनी ( Sharad Pawar ) आपल्या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला कालपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला होता. यानंतर मी माझ्या निर्णयावर विचार करेन असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज यासंबधी प्रतिक्रिया दिली.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं : शरद पवार 

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होत. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला आहे. तसचं अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यांनी 5 मे ला बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपल्याला मान्य असेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. ही पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरची पहिलीच प्रतिक्रिया आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमण्यात आली असून या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांनी सांगितल्यानुसार ही बैठक 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे ला मिळणार आहे. यामुळे सर्वांचं लक्ष आता 5 मे च्या निर्णयाकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.