Sanjay Raut VS Nana Patole | नाना पटोलेंना त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही, मग आपण का घ्यायचं?- संजय राऊत

Sanjay Raut VS Nana Patole | बेळगाव : खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांना सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी घेरलं असुन त्यांच्यावर शाब्दिक टीका – टिपण्णी होताना पाहायला मिळतं आहे. परंतु आज ( 3 मे ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. कारण शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा उल्लेख करून काँग्रेस मध्ये अध्यक्ष कोणी का असेना पण निर्णय हा गांधी कुटूंबच घेत असल्याचं म्हटलं होत त्यावरून पटोले यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. तर काटा संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर असुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे.

त्यांचा पक्ष त्यांना गांभीर्याने घेत नाही : संजय राऊत ( Sanjay Raut Commented On Nana Patole)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावर पलटवार करत म्हटलं आहे की, आहो ते नाना पटोले आहेत. काय एवढ गांभीर्याने घ्यायचं आहे. त्यांचा पक्ष त्यांना गांभीर्याने घेत नाही मग आपण का घ्यायचं? तर मी राहुल गांधींशी या विषयावर चर्चा करेल आणि त्यांच्यापेक्षा जास्त राहुल गांधी माझ्याशी बोलतात असं संजय राऊत म्हणाले. तर राऊतांच्या या पलटवारानंतर नाना पटोले याची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले ( Nana Patole Comment On Sanjay Raut )

नाना पटोले(Nana Patole) यांनी सकाळी संजय राऊतांचा समाचार घेत म्हटलं होत की,म संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. यामुळे यांनी चोंबडेगिरी थांबवावी. आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नका अशा शब्दांत नाना पटोले यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साध्य परिस्थितीबाबत तो त्याच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं देखील म्हटलं होत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.