Jayant Patil | बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल – जयंत पाटील

Jayant Patil | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. अशात पवारांच्या निर्णयाबाबत सुरू असलेल्या बैठकीला जयंत पाटील यांना बोलवण्यात आलं नाही. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “पक्षाला मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. ही बैठक राष्ट्रीय स्तरावरची आहे. त्यामुळे त्यांना मला बोलवण्याची आवश्यकता वाटली नसेल. सगळीकडे आपण पाहिजेत असा आग्रह मी नाही करतं.”

पुढे बोलताना पाटील (Jayant Patil)  म्हणाले, “मी पक्षावर नाराज नाही आणि पक्ष देखील माझ्यावर नाराज नाही. फक्त त्यांना मला बैठकीला बोलवण्याची आवश्यकता वाटली नसेल. सगळे बैठकीमध्ये जे निर्णय घेतील त्याच्यावर आपण चर्चा करू.”

सकाळपासूनच जयंत पाटील (Jayant Patil)  यांना बैठकीला बोलावलं नसल्याची चर्चा सुरू आहे. जयंत पाटील यांनी शरद पवारांना फोन केला होता. पवार आणि पाटील यांच्यामध्ये झालेली चर्चा अजून गुलदस्तात आहे. शरद पवारांनीच पक्षाचे अध्यक्षपद सांभाळावं अशी इच्छा देखील जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या