Share

Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले

Nana Patole | नागपूर : नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना पवारसाहेब सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,असा दावा करत म्हटलं आहे. याचप्रमाणे नाना पटोले यांनी खासदार संजय राऊतांचा ( Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसचे … Read more

Published On: 

Nana Patole | नागपूर : नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना पवारसाहेब सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,असा दावा करत म्हटलं आहे. याचप्रमाणे नाना पटोले यांनी खासदार संजय राऊतांचा ( Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र निर्णय राहुल गांधींच घेतात असं वक्तव्य केलं होत यावर पटोलेंनी त्यांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले नाना पटोले ( Nana Patole on Sanjay Raut)

नाना पटोले(Nana Patole) म्हणाले की, संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. यामुळे यांनी चोंबडेगिरी थांबवावी. आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नका अशा शब्दांत नाना पटोले यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. तसचं राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करेल असं वाटत नाही. शरद पवार शाहू, फुले,आंबेडकर विचारांचे असून ते भाजप सोबत जाणार नाही असा आमचा विश्वास आहे अशा बातम्या भाजपकडून पेरल्या जाऊ शकतात. असं देखील नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, पटोले यांनी राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर आम्ही भाजपविरोधात लढू असा दावा देखील केला आहे. याचप्रमाणे महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवार सोनिया गांधीकडे गेले होते. सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या.असं देखील पटोले म्हणाले.
तसचं जे काही शरद पवार यांच्या आत्मचरित्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दल आरोप करण्यात आले आहे. त्याबद्दल योग्य वेळी उत्तर देऊ असा इशारा देखील नाना पटोले दिला आहे. याचप्रमाणे जो काही सध्या पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं त्यामध्ये आम्ही फारसा हस्तक्षेप करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install