IPL 2023 | ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. अशात खेळाडूंच्या वाढत्या दुखापतीमुळे बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे. टीम इंडियातील आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

 ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर (‘this’ player out of IPL 2023 due to injury)

लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकर (Jaydev Unadkar) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. रविवारी नेटमध्ये सराव करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या (IPL 2023) उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या या दुखापतीमुळे संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जयदेव उनाडकरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. नेट प्रॅक्टिस करत असताना तो डाव्या हातावर पडला. त्यानंतर काही वेळाने तो त्याच्या खांद्यावर बर्फाचा पॅक घेऊन दिसला. 7 जून पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याआधी तो तंदुरुस्त होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या प्रकरणावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यामध्ये बाउंड्री लाईनवर चेंडूचा पाठलाग करत असताना केएल राहुलला गंभीर दुखापत झाली आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीमध्ये कृणाल पंड्या संघाचे नेतृत्व करणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये राहुलने बॅटिंग केली होती. मात्र, फिल्डिंग करताना जखमी झाल्यामुळे तो मैदानाबाहेर (IPL 2023) गेला. त्यानंतर संघाचे नेतृत्व कृणाल पंड्याने सांभाळले होते.

महत्वाच्या बातम्या

Back to top button