Sharad Pawar | आत्मचरित्राच्या माध्यमातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका; म्हणाले…

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या आत्मचरित्राच्या माध्यमातून बरेच धक्कादायक खुलासे झाले आहे. यामध्ये पवारांनी काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे. यानंतर काँग्रेस नेते यावर काय प्रत्युत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आत्मचरित्रातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका (Sharad Pawar’s criticism Congress)

महाविकास आघाडी बनवताना काँग्रेसला सोबत घेताना नेमकं काय घडलं होतं? याची माहिती पवारांनी (Sharad Pawar) या पुस्तकात दिली आहे. महाविकास आघाडी सरकार बनत असताना काँग्रेसने अहंकारी भूमिका साकारली होती, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार बनण्यासाठी काँग्रेसची सोबत महत्त्वाची होती. सोनिया गांधी यांनी आमदारांसोबत संवाद साधून साथ दिली. मात्र, सरकार बनवत असताना काँग्रेसची अहंकारी वृत्ती आम्हाला अनुभवायला मिळाली, असं पवारांच्या आत्मचरित्रामध्ये नमूद केला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) काँग्रेस विरोधात जाहीरपणे बोलणं टाळतात. मात्र, पवारांनी आत्मचरित्राच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका केली आहे. महाविकास आघाडी बनवताना काँग्रेसकडून दबावाचे राजकारण सुरू होतं, असं पवारांच्या पुस्तकात म्हटलं आहे. त्याचबरोबर माविआ सरकार स्थापन करत असताना आम्हाला काँग्रेसची अहंकारी वृत्ती अनुभवायला मिळाली असे देखील पवारांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे.

दरम्यान, पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) राजकीय आठवणींमध्ये गुंग झाले होते. ते म्हणाले, ” 1967 साली मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी विविध पदांवर काम केलीत. तेव्हापासून राजकारणात मी आहे. यानंतर आता फक्त तीन वर्ष मी राजकारणात राहणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.