Sushma Andhare | शरद पवारांना सुषमा अंधारेंच भावनिक पत्र; म्हणाल्या…

Sushma Andhare | मुंबई : काल (2 मे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान मोठी घोषणा करता राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना विरोध करत तुम्ही हा राजीनामा … Read more

Published On: 

Sushma Andhare | मुंबई : काल (2 मे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान मोठी घोषणा करता राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना विरोध करत तुम्ही हा राजीनामा माघारी घ्या असं म्हटलं आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत यातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शरद पवारांना भावनिक पत्र लिहलं आहे.

पत्राद्वारे काय म्हणाल्या सुषमा अंधारे 

सुषमा अंधारेंचं भावनिक पत्र सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यांनी पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काही वर्षे काम केल्यामुळे भावनिक झाली असल्याचं देखील म्हटलं आहे. तर पुढे त्यांनी पत्राच्या सुरुवातीला
आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब
अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस
सर नमस्ते.
खरंतर तर मी आपल्याला असं काही पत्र लिहावे किंवा सांगावे एवढी माझी प्रज्ञा निश्चितच नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्य ही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही. सर , बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होतं ते आज असेलच असं नाही जे आज आहे ते उद्या राहीलच असं नाही पण काहीही असलं तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.

तसचं सर, कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील. माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केली आहे. यांची जाणीव आहे. याचप्रमाणे रामदास आठवले हे नेतृत्व सर्वात आधी तुमच्या डोळ्यांनी पारखल होत. तुमच्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले. तुम्ही जो प्रयोग केला यामध्ये एकीकडे ना धो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला.

Sushma Andhare Write letter to sharad pawar 

तसचं एक नेतृत्व , दोन वक्तृत्व , तीन विचारधारा , चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही. याचप्रमाणे या शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही……. पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याची हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहेत.
-प्रा. सुषमा अंधारे

असं भावनिक पत्र सुषमा अंधारे यांनी पवारांना लिहलं आहे. या पत्रांची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही