Anjali Damania | अंजली दमानिया यांची शरद पवारांच्या राजीनाम्यावर आरोप करत प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Anjali Damania | मुंबई : आज शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत होता त्यावेळी शरद पवारांनी यांनी निवृत्ती होण्याचा निर्णय सांगितलं. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत शरद पवारांनी राजीनामा देणं मला अपेक्षित होतं असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली अशात दमानिया यांनी एक वेगळाच आरोप शरद पवारांवर केला आहे.

अंजली दमानिया यांनी शरद पवारांबद्दल काय म्हटलं ( What Anjali Damania said about Sharad Pawar )

तर गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अंजली दमानिया यांनी सांगितलं होतं की, भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती करायची आहे. पण त्या युतीत त्यांना शरद पवार नको आहे तर त्यांना फक्त अजित पवारच हब आहेत. अजित पवार जर पक्ष फोडून गेले असते तर ते शरद पवारांना मान्य झालं नसतं. म्हणून त्यांनी आता हा निर्णय घेतला असावा. याचप्रमाणे आपण उभा केलेला पक्ष फुटताना पाहणं किंवा राजीनामा देणं आणि अजित पवारांना अध्यक्ष करणं असे दोनच मार्ग शरद पवारांपुढे उरले होते. आत्ताच्या घडीला जे काही दबावतंत्र चाललं आहे ते भाजपचं आहे. भाजपाला महाराष्ट्रावर पकड तयार करायची आहे त्यासाठी ते वाट्टेल ते करतील. आज जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आपण अजित पवार यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर ते सारखे कार्यकर्त्यांवर चिडत होते. त्यावरूनच सगळं लक्षात आलं.” असंही दमानिया यांनी आरोप करत म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी गोंधळ करत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना गप्प बसण्याचं आवाहन देखील केलं. तरीदेखील नेते, कार्यकर्ते शांत होताना दिसत नव्हते. यावेळी अजित पवार यांनी सर्वांना चांगलचं झोडपल. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. शरद पवार यांच्या जेवणाची वेळ ठरलेली असते ती टळून गेली आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांना इथून जाऊ द्या. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर शरद पवार हे कार्यक्रम स्थळावरून सिल्वर ओक या ठिकाणी गेले आहेत. मात्र कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. निर्णय मागे घेतल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही ही त्यांची भूमिका आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.