Sharad Pawar | अजित पवारांचा पत्ता कट? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार ‘ही’ महिला

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. मात्र, शरद पवार राजीनामा मागे घेणार नसल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार ‘ही’ महिला (‘This’ woman will be the president of NCP)

मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष पद मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा ऐवजी एका महिला नेतृत्वाकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सुप्रिया सुळे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. कारण अजितदादा यांच्या तडकाफडकी निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे पक्षाला भविष्यात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अजित पवार यांच्या नावाला पक्षातून ना पसंती असल्याची माहिती मिळाली आहे.

अजितदादा नाही तर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता अधिक आहे. कारण सुप्रिया सुळे यांचा स्वभाव शांत आहे. मीडियासमोर कसं आणि किती बोलायचं यांचं त्यांना अचूक ज्ञान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे विराजमान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं आहे. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, “तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहात. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षात नाही असं नाही. साहेब निवृत्त जरी होत असले तरी ते पक्षासाठी कायम हजर राहणार. साहेबांच्या वयाचा विचार करत आपणही जबाबदारी दुसरे नेतृत्वाकडे देत आहोत. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.